फॉलोअर

रविवार, १९ जुलै, २०२०

गटारी नाही/दिवे अमावस्या/No gutters / lights New moon

            🙏नमो दिप देवताय नमः🙏
नमस्कार मित्रानो,आज एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे कारण,आताच अमावस्या प्रारंभ झाली व ती उद्या पर्यांत आहे,तुम्ही म्हणाल ह्यात काय नविन आमावस्या तर दर पंधरवाड्याला आसते,बरोबर आहे तुमच, पण आपल्या हींदु धर्मात गटारी नावाने प्रसिद्ध झालेली ही एकमेव अमावास्या हो की नाही दारु पिणार्यांचा व मास खाणार्यांचा हा शेवटचा दिवस,कारण श्रावणा पासुन ते थेट दसर्या पर्यंत लोक स्वताच मन मारतात का तर देव व धर्मासाठी, कीती हा मोठा त्याग,निष्ठा,धर्म आस्था,धर्म निष्ठा व धर्म पालन,हींदु धर्माचा उद्धारच करतोणा आपण, मग मला एकाच प्र्शानाच उत्र द्या लक्षमी पुजनाचा अगोदर नरक चतुर्थीला का हो आपण दारु व मास खात नाही, का त्याचा दुसर्यादीवशी लक्ष्मी पुजनाला ही अमावस्याच असते ना विसर्लात का? जो मुहुर्त जे स्थान लाक्षमी पुजनाच्या अमावस्येला आहे तेच स्थान आषाढ अमावस्येला आहे मग अस का? जस आपण लक्ष्मी पुजनाला दीप लावतो लक्ष्मीच आवाहन करतो आणि सगळ घर समाज देश दीपदान करुन अमावस्येला उजळवतो म्हणजे आपल्या मनातला नात्यातला अंधार दुर करतो, तसच आज आषाढ अमावस्येला ही आपल्या घरातिल सर्व दीवे दीपमाल निरंजन घरातल्या स्त्रीने  धुवुन एका पाटावर मांडुन प्रज्वलीत करून हा आंधार दुर कृरायचा आसतो ही खरी आषाढ अमावस्या....आपल्या धर्मात गटारी हे नाव व विषय ही नाही,आपल्या धर्माला बदनाम करण्यासाठी आपल्याच लोकान कडुन केलगेलेल हे पाप आहे दारु वाल्यांचा व मास विककणार्यांचा धंदा व्हावा म्हणुन आपल्या पवित्र आषाढ ला गटारी बोलतायात व आपली लोक ही खुषाल दारु व मास खातात व दुसार्या दीवसा नंतर श्रावण आहे म्हणुन हपताभर दारु व मासांची चर्चा आसते हीच का आपल्या धर्माची लायकी तुमीच सांगा,विचार करा आपण काय करतोय वा आपल्या तरुन तरुनिना काय देतोय...येणारी पिढी माफ नाही करणार आपल्याला म्हणुन थांबवा हे सगळ,.आणि दीप लावा आपल्या घरात दारात संस्काराची पार्टी करा मास व दरुची नाही...तुम्हा सर्वाना शुभ आषाढ अमावस्या शुभ दीपदीन....श्रीकांत जाधव        
Hello friends, today I want to make an important point because, just now the new moon has started and it is till tomorrow, you will say what a new moon is in it every fortnight, you are right, but is it the only new moon in our Hindu religion known as Gatari or not?  This is the last day for drinkers and meat eaters, because from Shravan to Dussehra, do people kill themselves, but for God and Dharma, what a great sacrifice, devotion, faith, devotion to Dharma and observance of Dharma, you are the savior of Hinduism, then me  Answer the same question. Before Lakshmi Pujana, why don't you eat alcohol and meat before Narak Chaturthi?  The moment which is the place of Lakshmi Puja's new moon is the same place as Ashadh's new moon. So why?  Just as we light a lamp for Lakshmi Puja, we invoke Lakshmi and light the new moon by lighting the whole house, society and country, that is, we remove the darkness in our minds, so today, on Ashadh Amavasya, all the lamps in our house are washed by Deepmal NIRANJAN.SHRKANT JADHAV
  ( आपल्या सर्वांना विनंती कि खालिल इतर लेखकांचे लेख ही वाचा)
१.आषाढ कृष्ण अमावास्या म्हणजे दिप अमावस्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधःकार दूर करून ज्ञानाचा दिवा म्हणजेच आत्मज्योत उजळण्याचा हा सण..!
घरातील सगळे दिवे साफ करून ते तेला,तुपाने प्रज्वलित करावेत त्यांची पंचांमृताने पूजा करावी त्यांना गंध,फुल,हळद,कुंकू आघाडा,गोमेटा वाहवा गोड पुरणाचे धिंडे करावेत.कणकेचा दिवा तयार करावा.दिव्यांची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी.की,"हे दिपदेवता जगाच्या कल्याणासाठी तू तेजोमय हो.अंधःकाररुपी सगळ्या दुष्टशक्ती तुझ्या प्रखर तेजाने नष्ट कर".श्रावण महिना सुरु होण्याआधीचा हा महत्वाचा दिवस आहे.
श्रावण सुरु झाल्यावर पावसाळा असल्याने ऋतुमान बदलानुसार शरीराला जड आहार सहज पचत नाही.म्हणून या महिन्यात जास्त उपास-तापास केले जातात. शक्यतो हलका,पचण्यास योग्य आहार श्रावण महिन्यात घेतला पाहिजे.म्हणून मांसाहार,मद्यपान टाळावे.
आषाढ नंतर श्रावण हा काळ विविध प्रकारच्या मासळीच्या प्रजननाचा मुख्य काळ असतो. यावेळी जर चांगले प्रजनन झाले तर पुढील काळात मच्छिमारांना उत्तम मासे समुद्रातून उपलब्ध होतात.या कारणाने सुद्धा श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही.
'गटारी अमावास्या' अशा प्रकारच कुठलाही उल्लेख धर्मशास्त्रात नाही.आस्तिक किंवा नास्तिक अशा कोणत्याही प्रकारातले तुम्ही असलात तरीही आपल्या संस्कृती मधल्या सण उत्सवांकडे नीट डोळसपणे पाहणे आवश्यक आहे.
गटारात पडणाऱ्या म्हणजेच अति मद्यपान,मांसाहार करून गटारात लोळणाऱ्या व्यक्तींसाठी हे विशेषण वापरले जाते.मूर्ख लोकांनी त्याचा 'गटारी अमावास्या' नावाचा विचित्र सण तयार केला.कुठल्या वेळी कुणी,काय,कसा आहार घ्यावा यावर निसर्ग मनुष्याला नेहमी सतर्क करत असतो. निसर्गाचे बदल आणि त्यानुसार काय अनुकरण असावे हे कोणत्याही सजीवाला सहज लक्षात येते परंतु मनुष्याला हे लक्षात येऊन सुद्धा तो त्यानुसार अनुकरण करत नाही,हे दुर्दैव आहे.आणि म्हणून तो अनेक साथीच्या रोगांना बळी पडतो.मनुष्याला ज्याप्रमाणे आजार होतात त्याच प्रमाणे ते प्राण्यांना देखील होत असतात याचे भान मात्र माणसाला नसते असे प्राणी खाऊन माणसांमध्ये असाध्य रोग-राई पसरते.
श्रावण महिन्यातील रानात उगवलेल्या वेगवेगळ्या भाज्या, पालेभाज्या यांमध्ये चांगले जीवनसत्व असते.या शरीरासाठी  पौष्टीक असतात त्यातील काही भाज्या उपास असताना खाल्या जातात.यामुळे पचनक्रिया देखील चांगली राहते.या महिन्यात  उपासनेला जास्त महत्व दिले पाहिजे.
श्रावण महिन्यात वाचण्यात येणाऱ्या प्रत्येक वारांच्या कहाण्या या गोष्ट म्हणून न ऐकता,यातून आजच्या काळात आपल्याला नेमका काय बोध घेता येईल? हा विचार महत्वाचा आहे.
दुर्दैवाने आपले सण-उत्सव याचे महत्व लक्षात न घेता यावर घाणेरडी टिका करून चेष्टा करण्याचं काम सुरू असते.असे न करता याविषयी योग्य ती माहिती करून घेणे हे आवश्यक आहे.
या "दिप अमावस्येच्या" निमित्ताने अति मद्यपान,मांसाहार करण्यापेक्षा घर परिसर स्वच्छ करणे,दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करणे,व्यक्तिगत आहार -विहार याचे भान राखणे जास्त महत्वाचे आहे.दिव्यांच्या तेजाने आपल्या घर-परिसरात पसरणारी सकारात्मक ऊर्जा जपली गेली पाहिजे.
आपल्या संस्कृतीचे,सणांचे महत्व  व्यवस्थित माहिती करून घेऊन इतरांनाही समजावून देता आले पाहिजे.
 *श्री दिपक विद्याधर वैद्य. गुरुजी (अंजनवेल)*(Cp)

चिंतन

२." दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"

===================================

दीप (दिवे धुन्याच्या) अमावस्येला काही विकृत लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे...! मुळात गटारी अमावस्या असा काही सण,उत्सव  आपल्या हिंदू धर्मात नाहीये...!
गटारी अमावस्या हे नामकरण दारुड्या टवाळांनी केले आहे...!
दीप अमावस्या या दिवशी घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. प्रकाश,हा सर्व जाती धर्मातील लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर करत असतो.त्याच  प्रकाशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव, दिप अमावस्या..! त्यामुळे ह्या दिवसाला दीप अमावस्याच (दिवे धुन्याची)   म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका..!🙏

कोणीही ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात...!वेळी च सावध व्हा.. उद्या हे विकृत दारुडे म्हणतील की हिंदू धर्मच आम्हाला गटारी अमावस्या साजरी करायला लावतो, अन् सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावे...!

तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या दीप अमावस्या विषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या प्रकाशाच्या उत्सवाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती...!🙏

तसेच आपल्या हिंदू धर्माच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा मान राखून दीप अमावास्येला गटारी अमावस्या न म्हणता दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या भारतीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा, सणांचा व संस्कृतीचा मान राखावा..! 

वंदे मातरम्...!!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1“गटारी” अमावस्या म्हणजे आपली “दीप अमावस्या”

३.हा लेख मला आत्ता एव्हढ्या आधी लिहाण्याचे कारण सांगतो. दिप अमावस्येला  गटारी अमावस्या म्हणणे मला कधीच रूचलेलं नव्हतं ,नाही,मी कधीच म्हणणार पण नाही. माझ्या लहानपणा पासुन मी कांदेनवमी हेच एकत मोठा  झालोय कारण माझा जन्म डोंबिवली मधल्या सदाशिव पेठेत झालाय! डोंबिवली मधली सदाशिव पेठ म्हणजे टिळकनगर . खरोखर मला अभिमान वाटतो माझा जन्म टिळकनगर  डोंबिवली  मध्ये झाला आणि अजुन पण मी तिथंच राहतोय. मला कांदेनवमी किंवा दिव्यांची अमावस्या  माहित होती काही केल्या गटारी अमावस्या मान्य नाही म्हणुन हा लेखन प्रपंच 

दरवर्षी  श्रावण सुरू होण्या आधी येत  असलेली “गटारी” अमावस्या म्हणजे मुळातील आपली “दीप अमावस्या”…

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि विनाशाय दीपत्ज्योति नमोस्तुते ||
पंचमहाभूतांमधील एक म्हणजे – अग्नी देव … त्याचेच रूप म्हणजे आपला दिवा.
दिव्याचे स्थान आपल्या घरोघरी देवघरात तर आहेच पण प्रत्येक शुभ कार्यात आपण तेलाचा आणि तुपाचा असा दिवा जरूर लावतो. आपण केलेले एखादे कर्म ह्याची साक्ष म्हणजे दिवा असतो असे आपल्या शास्त्रात म्हणले आहे. कितीही Tubelights आल्या, विविध प्रकारचे इलेक्ट्रिक दिवे आले तरी जी शांती आणि समाधान आपल्याला समईच्या ज्योतीकडे पाहून मिळते ते असंख्य इलेक्ट्रिक रोषणाईने सुद्धा मिळत नाही.
ह्या दिवशी दीप पूजन कसे करावे? 
आपल्या घरातील, काना कोपऱ्यातील, कपाटातील चांदीचे, पितळेचे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ह्या सर्व दिव्यांची पूजा करायची. रांगोळी काढायची. पाटावर दिवे मांडून त्यांना गंध, फूल आणि अक्षता वाहायच्या. नमस्कार करायचा. गोडाचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्याला कणकेचे गोडाचे दिवे ठेवण्याची खरी प्रथा आहे. पण जमले नाही तर कुठलाही गोडाचा नैवेद्य दाखवायचा.पाटावर ठेविलेल्या दिव्यांची आरती करायची. दिव्यांची प्रार्थना करायची. “आमच्या जीवनातील, मनातील, बुद्धीतील सर्व अंधःकार नष्ट होउदे. जसा दिवा इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतो तसेच आमच्या हातून सुद्धा देशासाठी, समाजासाठी काहीतरी हिताचे होउदे.”
आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.
ह्या वर्षीपासुन आणण सगळे मिळुन ठरवुया  श्रावण  सुरू होण्या आधी येणार्या अमवस्येला  आपण दीप अमावस्या  म्हणुया आपण पारंपरिक पद्धतीने अगदी सहजपणे साजरी करूयात आणि येणाऱ्या श्रावण मासाचे स्वागत करूयात…

काय मंडळी मग दिव्यांची अमावस्या म्हणुनच साजरी करणार ना?  आणि निदान मराठी भाषिक माणसाला गटारी अमावस्या  न म्हणता निदान दिव्यांची अमावस्या म्हणायला लावणार ना? 

निदान माझ्या परीनं तरी मी हा नेटानं प्रयत्न  करतोय तुमची साथ मिळाली तर बरंच हाईल

®️©️सचिन जोग
हे सर्व सांगण्याचा उद्देश स्वत्व जपा             श्रीकांत जाधव     informationisimportan.blogspot.com

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

मराठी मोडी लिपी/Marathi modi lipi script

 हो १९५७ साली मोडी लिपी हद्दपार करण्याचे कारस्तान विधानभवनात झाले हे खर. ती एक चुक पुन्हा कोणीच सुधारली नाही. आजही जर मोडी अभ्यासक्रमात आणली गेली तर येत्या १० वर्षात मोडी लिहीणारे वाचणारे तयार होतील आणि परत महाराष्ट्राची मुळ शिवरायानी घडावलेली मोडी उदयास येईल. आणि मग ती प्रशासनात आणुन जेव्हा रस्यावरच्या पाट्या मोडीत, इंटरनेटवर मोडी,शासन कागदपत्रणवर मोडी दीसेल तेव्हा परप्रंतीय आणि इथे येणार्याना आपण हींदी मराठी टाइपरायटरवर एकत्र बसत नाही हे कळेल, आणि  शिवरायानी गुप्त शत्रुना स्वराज्याच्या मसलती कळु नये म्हणुन मोडीची निर्मिती केली. हीच मोडी १९०० शतकापर्यंत चालत होती, उत्तरेत पेशवे काळात आणि प्रमुख दक्षिनेत शिवरायांचा काळात. नंतर बंगळुर ते तंजावुर वैंकोजी राजे पासुन पिलाजीरावा भोसल्यांन पर्यंत मोडी सर्वानी स्वीकारली वृ आपल्या सोई प्रमाने वळवली. मोडी ही एकमेवृ लिपी ज्यात १६०० शतका पासुनचे इंग्रजान पर्यंतचा सर्वच संस्थानांचा सगळा इतीहास मोडीत आहे. तंजावुरच्या सरस्वती लायंबरींरी ही मरठ्यानी दीलेली देशला एक भेट आहे. आज भारतातील असे करोडो कगदपत्र आहेत जे मोडीतच आहे पण वाचणारे समाजणारे व अनुवाद करणारे कमी आहेत. शासनाने आपण आणि मराठी माणसाने ठरवल तर पुढील १० वर्षात मराठी भाषेचा कायापालट होउ शकतो. आपली बोली तीच रहाणार, फक्त लिपी बदलेल ह्याने मराठी मोडीला इतकी मागणी येईल तुम्ही विचार ही करु शकत नाही. मी ह्या वर्षी मोडीचा वर्ग लावणार होतो. पण नाही जमल, पुढच्या वर्षी नक्की.          श्रीकांत जाधव
Yes, it is true that the conspiracy to ban Modi script took place in the Vidhan Bhavan in 1957.  No one corrected that one mistake again.  Even today, if Modi is introduced in the curriculum, in the next 10 years, Modi-writing readers will be ready and Modi, the original Shivaji maharaj of Maharashtra, will emerge again.  And then by bringing it into the administration, when the billboards on the road, Modi on the internet, Modi on government documents will appear, foreigners and visitors will know that you do not sit together on a Hindi-Marathi typewriter, and Shivji maharaj created Modi so that secret enemies do not know Swarajya.  This was the Modi movement till the 1900s, during the Peshwa period in the north and during the Shivaji maharaj period in the major south.  Later, from Bangalore to Thanjavur Vankoji Raje to Pilajirao Bhosale,Modi accepted everyone and turned around as per his convenience.  Modi is the only script in which the entire history of all the states from the 1600s to the British is broken.  The Saraswati Library in Thanjavur is a gift from the Marathas to the country.  There are millions of documents in India today that are in a state of disrepair but are read by socialites and translators.

Information is important

मराठी मोडी लिपी/Marathi modi lipi script